Monday, July 8, 2019

सामजिक संशोधन पायऱ्या
प्रस्तावना
समाजकार्य संशोधन करण्यासाठी सर्वप्रथम सत्य शोधणे आवश्यक असते. जर आपल्याला संबंधित समस्या बद्दल जर सत्य माहीत नसेल तर आपण प्रभावीपणे सामजिक संशोधन करू शकत नाही.  कोणत्याही सामाजिक समस्येची निवड ही  संशोधनकर्ता संशोधनाचा विषय म्हणून निवडू शकतो. परंतु सर्व सामाजिक समस्या या संशोधनाचा विषय असतातच असे नाही. समाजकार्याच्या सहा पद्धती आहे. सामाजिक संशोधन हे समाजकार्याची सहावी पद्धती आहे. सामाजिक संशोधनामध्ये शास्त्रीय अशी प्रक्रिया आहे. सामाजिक संशोधन करण्यासाठी सामाजिक संशोधनाच्या सात पायऱ्या आहेत.
व्याख्या
‘आम्ही एक वैज्ञानिक उपक्रम म्हणून सामाजिक संशोधन परिभाषित करू शकतो जे तर्तीक आणि व्यवस्थित पद्धतीने ,नवीन तथ्ये किंवा जुन्या तथ्ये  शोधण्याचा आणि त्यांच्या उपक्रमांची परस्पर संबंध ,प्रासंगिक  स्पष्टीकरणे विश्लेषण  करण्यासाठी आणि नैसर्गिक कायदे त्यांचे पालन करतात.’
 समस्या सूत्रण
साहित्याचा आढावा
संशोधन आराखडा तयार करणे.
 तथ्यांचे संकलन व वर्गीकरण
 तथ्यांचे विश्लेषण व निष्कर्ष
 निष्कर्षाची निर्वचन
अहवाल लेखन
समस्या सूत्रण
समस्या सूत्रण हे सर्वात कठीण काम आहे. संशोधनातील संशोधन त्याच्या आवडी चा विषयी संशोधनास निवडू शकतो. समस्येची निवड करणे म्हणजेच संशोधन विषयाची निवड करणे. बऱ्याच वेळा सामाजिक समस्या या संशोधनाचा विषय होऊ शकतात. परंतु संशोधनाचे सर्वच विषय हे सामाजिक समस्या असू शकत नाही. त्यानंतर परिसराचे क्षेत्राची निवड करणे परिसर म्हणजेच संशोधन क्षेत्र मर्यादित असल्यास संशोधन करणे हे सोपे जाते म्हणजेच संशोधन करतात संशोधन कोठे करणार आहेत त्याची निवड करणे म्हणजेच परिक्षेत्राचे निवड करणे होय. उदाहरणार्थ नाशिक शहर परिक्षेत्र हे संशोधनासाठी निवडले.
साहित्याचा आढावा
संशोधन करत असताना साहित्याचा आढावा घेणे हे महत्त्वाचे ठरते. साहित्याचा आढावा यामध्ये संशोधनाशी संबंधित असलेले साहित्य म्हणजेच विविध तज्ज्ञ लोकांनी संबंधित विषयाशी मांडलेले साहित्य कथा कादंबऱ्या पुस्तके यांचा समावेश होतो. यांचा अभ्यास करून विषय संबंधित अधिक माहिती मिळविता येते साहित्याची मदत घेऊन विषयासंबंधी अधिकारी ज्ञान प्राप्त होऊन संशोधनास मदत होते. त्यामुळे साहित्याचा आढावा हा महत्त्वाचा ठरतो.
3)संशोधन आराखडा तयार करणे 
संशोधन आराखडा यामध्ये प्रामुख्याने नियोजन केलेले असते. संशोधक संशोधन कशाप्रकारे करणार आहे हे यामध्ये ठरविले जाते. संशोधन करत असताना उपलब्ध असणाऱ्या प्रसाधनांचा वापर कशा प्रकारे करावा याचा पूर्व अंदाज हा यामध्ये बांधला जातो. हे एक प्रकारचे नियोजन असते. या नियोजनामुळे म्हणजेच संशोधन आराखडा मुळे वेळ पैसा परिश्रम संसाधनांचा वापर यांच्यामध्ये बचत होते. म्हणूनच संशोधन आराखडा हा महत्त्वाचा ठरतो विविध तंत्रे साधने यांचा वापर कशाप्रकारे करणार आहोत हे संशोधन आराखडा मध्ये दर्शविलेले असते किंवा नियोजन केलेले असते.  नमुना निवड नमुना निवड मध्ये दोन प्रकार पडतात संभाव्य नमुना निवड व संभाव्य नमुना निवड या नमुना निवडींचा उपयोग करून संशोधन आराखडा तयार केला जातो.
4) गृहीतकृत्यांची निर्मिती
निवड करण्यात आलेल्या संशोधन विषय समस्यांचे संभाव्य उत्तर किंवा स्पष्टीकरण म्हणून मांडण्यात आलेले विधान म्हणजे गृहीतकृत्ये होय. त्यामुळे संशोधन संशोधनाला दिशा प्राप्त होत असते. संशोधन विषयाचे पूर्वज्ञान आणि माहितीच्या आधारावर त्यांची निर्मितीही केली जाते त्यामुळे आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होते. सिद्धांतिक दृष्ट्या सोपे, वैशिष्ट संशोधन समस्येच्या संदर्भात अनुकूल आणि निरीक्षणक्षम असणे आवश्यक आहे. गृहीत कृत्य हे संशोधन समस्येचे संभाव्य उत्तर असले तरी ते खरे ठरेल असे नाही कृतकृत्य हे पूर्व अंदाज असतात.
5) तथ्यांचे संकलन व वर्गीकरण
A) तथ्य संकलन करण्यासाठी दोन प्रकार पडतात. संशोधन विषयाच्या अनुषंगाने संशोधन करतात त्यांचे संकलन हे करत असतोच प्राथमिक व दुय्यम स्त्रोतांवर हे तथ्य संकलन हे केले जाते.
a) प्राथमिक तथ्य संकलन
प्राथमिक संकलन मध्ये संशोधन करता प्रत्यक्ष जाऊन माहितीही मिळत असतो.
1.निरीक्षण  2.प्रश्नावली 3.अनुसूची 4. मुलाखत तंत्रांच्या साह्याने माहिती मिळविली जाते.
b) दुय्यम तथ्य संकलन
 दुय्यम तथ्य हे सामाजिक संशोधनामध्ये आधी गोळा केले जाते. व नंतर प्राथमिक गोळा केले जातात. त्यामध्ये पुस्तके ग्रंथ व मासिके वृत्तपत्रे यांचे भाषण कागदपत्रे यांच्या द्वारे माहिती जमा केली जाते मिळविली जाते त्याला म्हणतात. प्रभावी तथ्य संकलनासाठी वाचन व मनन महत्त्वाचे ठरते याला ग्रंथालय पद्धती असे म्हणतात.
B) तथ्यांचे वर्गीकरण
तथ्य संकलनाच्या आधारित त्यांचे वर्गीकरण केले जाते. संकलन केल्यानंतर त्यांचे वर्गीकरण करणे हे आवश्यक असते. कारण संकलित केलेली माहिती ही अस्ताव्यस्त आणि विखुरलेले असते. म्हणून त्यांचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे ठरते. माहिती व्यवस्थित स्वरूपात मांडली जाते म्हणजेच माहिती वाचणे सोपे होते. त्यांचे वर्गीकरण हे प्रथम मधील साम्य व भेद व इतर आधारावर केले जाते. त्यांचे वर्गीकरण हे आवश्यक असते.

6) विश्लेषण व निष्कर्ष
विश्लेषण व निर्वचन व्यवस्थापक प्रक्रिया आहे. विश्लेषण ही व्यापक प्रक्रिया असून त्यात परस्परांशी संबंधित अधिकाऱ्याच्या समावेशकता त्यांचे परीक्षण करीत असते. संकलित केलेल्या तथ्यांचे वर्ग पाडण त्यांचे चित्रीकरण करणे. त्यांच्या सारण्या तयार करणे, कोष्टके तयार करणे,  संख्याशास्त्रीय निष्कर्षाचे प्रतिपादन करणे,  मिळवलेली माहिती सहज सोपी व्हावी म्हणून त्यांचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे विश्लेषण करणे संशोधनामध्ये महत्त्वाचे ठरते.
7) निष्कर्षाचे निर्वचन व अहवाल लेखन
 संशोधन प्रक्रियेतील की सर्वात शेवटची पायरी आहे यावर काढलेले निष्कर्ष त्यांच्या सिद्धांतानुरुप किंवा सुसंगत आहे हे पाहिले जाते. इश्क निष्कर्षाच्या स्पष्टीकरणात संशोधन भाषा किंवा निर्वचन म्हणतात संशोधनातील मांडण्यात आलेल्या व्यापक करण्याचा शोध घेणे म्हणजेच निर्वचन होय.
निष्कर्षाची निर्वचन केल्यानंतर संशोधन कार्य संपे पर्यंत केलेले संशोधन हे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी संशोधन माहिती व्हावी यासाठी संशोधनाचा अहवाल तयार करणे हे महत्त्वाचे ठरते. अन्यथा संशोधन हे केवळ संशोधन करण्यापुरतेच मर्यादित राहिला संशोधन अहवालामध्ये
प्रस्तावना, समस्याचे वर्णन, संशोधनाचा उद्देश,  अध्यापन पद्धती, नमुना निवड, निर्वचन सूचना विश्लेषण इत्यादी गोष्टी सविस्तरपणे दाखवणे आवश्यक असते. अशाप्रकारे निष्कर्षाचे निर्वचन व वाल लेखन केले जाते. हे संशोधन कार्यातील शेवटची पायरी आहे हे सिद्ध होते.
सारांश
सामाजिक संशोधनाच्या सात पायऱ्या आहेत. या सातही वायर अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या पायर्‍यांच्या व्यतिरिक्त संशोधन करता हा वास्तविक माहिती गृहीतकृत्ये त्याचप्रमाणे निष्कर्ष हे मांडू  शकत नाही. संशोधनाचा उपयोग हा विविध पद्धतीने केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ घरगुती हिंसाचार या वरती केलेला केलेले संशोधन हे घरगुती हिंसाचार कायद्यामध्ये सुधारणा किंवा नवीन कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मदत करू शकते किंवा याचा संदर्भ म्हणून वापर केला जाऊ शकतो. सामाजिक  संशोधनाच्या मदतीने सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मदत ही केली जाते.

No comments:

Post a Comment